Optical illusion : ऑप्टिकल इल्यूजन असे फोटो असतात ज्यात लोकांना काही गोष्टी शोधायच्या असतात. म्हणजे त्या समोरच पण दिसत नाही. त्या शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. तर काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये तुम्हाला चुका शोधायच्या असतात. हा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा भ्रमात टाकणारा खेळ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. याद्वारे तुमची IQ टेस्टही केली जाते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे. हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. फोटोत तुम्ही बघू शकता की, एक महिला तिच्या रूममध्ये खुर्चीवर बसली आहे. तिच्या आजूबाजूला काही प्राणीही दिसत आहेत. सोबतच या फोटोत एक फुलपाखरूही लपलं आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही हे फुलपाखरू शोधू शकता.
केवळ ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत तेच वेळेच्या आत या फोटोतील फुलपाखरू शोधू शकतील. पण हे इतकंही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने आणि डोक्याचा वापर करून बघावा लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल.
जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील फुलपाखरू दिसलं असेल तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण अजूनही तुम्हाला यातील फुलपाखरू दिसलं नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ते शोधण्यात तुमची मदत करू.
खालच्या फोटोत फुलपाखराला सर्कल करण्यात आलं आहे.