Optical Illusion : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी काही घटनांचे फोटो व्हायरल होतात तर कधी काही बुचकळ्यात टाकणारे फोटो व्हायरल होत असतात. हे बुचकळ्यात टाकणारे फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो. असाच एक जुना ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जी तुमचं डोकं चक्रावून सोडेल.
हा डोकं चक्रावून सोडणारा एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा फोटोत तुमहाला समुद्र किनाऱ्यावर एक कपल मिठी मारताना दिसत आहे. यात पुरूषाने पांढऱ्या रंगाचे आणि महिलेने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. पण यांचा हा फोटो पाहून लोक प्रश्नात पडले आहेत.
दोघांच्या मिठीचं काही कन्फ्यूजन नाही तर कन्फ्यूजन आहे त्यांच्या पायांचं. फोटोत तुम्ही बघू शकता की, दोघांचेही पाय उलटे दिसत आहे. फोटो बघून काही लोक म्हणत हेत की, यात काहीतरी ट्रिक वापरली आहे. काही लोक तर याला भूतांचा फोटो म्हणत होते. फोटो जर बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की, हा फोटो ना भूतांचा आहे ना यात काही ट्रिक वापरलेली आहे. पण त्यासाठी तुमच्या तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी हवी.
सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, दोघांचेही पाय उलटे का दिसत आहेत? एकाने याचं रहस्य उलगडलं आहे. 'द सन' च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने बारकाईने फोटोचं विश्लेषण केलं. यानंतर सांगितलं की, महिला-पुरूषाने फोटो काढताना कोणत्याही ट्रिकचा वापर केलेला नाही. पण जसे की, आम्ही म्हणालो त्यांच्या कपड्यांमध्ये याचं रहस्य दडलं आहे.
पुरूषाने पांढऱ्या रंगाच्या टि-शर्ट सोबत काळी कॅप्री घातली आहे आणि त्या कॅप्रीमध्ये पांढऱ्या रंगाचा कापड गुंडाळला आहे. तो महिलेसोबत असा काही उभा राहिला की, हा फोटो अजब बनला. यामुळे समजत नाहीये की, कुणाचे पाय कोणते आहेत. पण यात काही ट्रिक नाही. हा केवळ कपड्यांमुळे झालेला घोळ आहे.
एका दुसऱ्या व्यक्तीने खुलासा केला की, 'पुरूषाने जो शार्ट्स घातला आहे त्याचे दोन रंग आहे. मधे पांढला आणि दोन बाजूला काळा. महिलेने काळ्या रंगाचे कपडे घातले आहे. ज्यामुळे हा भ्रम होत आहे. शॉर्ट्सचा काळा भाग पांढऱ्या भागाच्या वर येतो, पण हे केवळ त्यांचे कपडे आहेत जे भ्रम निर्माण करत आहेत'.
खालच्या फोटोत आहे उत्तर....