Optical Illusion Viral Photo: ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) ट्रेंड संपला आहे, तेव्हाच एक नवीन फोटो व्हायरल होतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आणि लोकांनाही विचार करण्यास भाग पाडलं. एक झोपडी आणि आसपास असलेल्या जंगलाचं विलोभनीय चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. परंतु, या फोटोमध्ये एक अस्वल आहे आणि ते कुठे आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. बराच वेळ या फोटोकडे पाहिल्यानंतरही तुम्हाला ते कदाचित सापडणार नाही.
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या फोटोवर जरा नजर टाका. या फोटोमध्ये लपलेलं अस्वल तुम्हाला सापडतंय का? कदाचित तो जमिनीवर आहे किंवा आराम करण्यासाठी झाडावरही चढलाय… पण याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला या फोटोकडे लक्षपूर्वक पाहायला हवं.
आता तुम्ही केवळ झाडाच्या फांद्याकडे पाहा. तुम्ही अजून पाहिलं नाही का? आम्ही समजू शकतो, कारण हे ऑप्टिकल इल्युजन थोडं गोंधळात टाकणारं आहे. फोटोतीस अस्वलाला शोधू न शकलेले तुम्ही एकमेव नाही, तर असे शेकडो लोक आहेत जे अयशस्वी झालेत. उत्तर जाणून घेण्यासाठी खालील चित्र पाहा.हे पाहा उत्तरतुम्हाला एका झाडाच्या फांद्यांनी तयार झालेली अस्वलाची प्रतिमा दिसेल. हे शोधल्यानंतर एका युझरनं आपण खऱ्या अस्वलाच्या शोधात असल्याचं म्हटलं. तर एका युझरनं अनेकदा शोधलं पण झाडाच्या फांद्यांवर असं काही दिसलं नसल्याचं म्हटलं. तर एका युझरनं मजेशीररित्या जसं आपण ग्रोसरी स्टोअरमध्ये सामान शोधतो तसंच हे अतिशय कठिण असल्याचं म्हटलं.