Optical Illusion: अलीकडील काळात ऑप्टिकल इल्युशन सॉल्व्ह करण्याचा नवीन ट्रेंड आल्याचे दिसत आहे. एखाद्या चित्रातून एखादी गोष्ट शोधताना डोक्याचा आणि बुद्धिचा चांगलाच कस लागताना दिसत आहे. तुम्ही अनेक वेळा ऑप्टिकल इल्यूशन सोडवले असतील. काही इल्युशन तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात, तर काही तुमच्या मेंदूची परीक्षा घेतात. ही कोडी सोडवल्यानंतर लोकांच्या मनात थोडा आत्मविश्वास वाढू लागतो. तथापि, अनेक ऑप्टिकल इल्युशन सोडवणे इतके अवघड आहे की, लोक अथक प्रयत्न करूनही उत्तर शोधू शकत नाहीत. लहानपणापासून रंगीबेरंगी असलेल्या जेम्सच्या गोळ्या खाल्ल्या नाही, अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. याच रंगीबेरंगी जेम्सच्या गोळ्यांमध्ये एक बटण दडलेले असल्याचे हे कोडे आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला अनेक रंगीबेरंगी जेम्सच्या गोळ्या पाहायला मिळतील. या सर्वांमध्ये एक बटण लपलेले आहे, परंतु ते आपल्या डोळ्यांना सहज दिसणार नाही. संपूर्ण फोटो अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की, हे कोडे सोडवणे अधिक कठीण होईल. हा फोटो तुमची वारंवार दिशाभूल करेल आणि योग्य उत्तर शोधण्यात अडथळे निर्माण होतील.
या फोटोमध्ये लपवलेले बटण शोधण्यापूर्वी तुमच्याकडे अवघी २० सेकंद आहेत. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारण्यापूर्वी फोनवर २० सेकंदांचा टायमर सेट करायला विसरू नका. आता तुमच्यासमोर दोन आव्हाने आहेत, पहिले या गोंधळात टाकणाऱ्या फोटोतून बटण शोधणे आणि दुसरे म्हणजे २० सेकंदात या कामात यशस्वी करून दाखवणे. फोटो सतत बघूनही तुम्हाला बटण दिसत नसेल, तर खालील फोटोमध्ये योग्य उत्तर पाहा...
हा फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झालात, तर अभिनंदन, तुमचे मन आणि डोळे खूप तेजस्वी आहेत. हे ऑप्टिकल इल्युशन सोडवणे खूप अवघड असले तरी, त्यामुळे लोकांचा (सोशल मीडिया यूजर्स) घाम फुटला आहे.