Find Frog in the Photo: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये काहीना काही रहस्य दडलेले असतात. म्हणजे जे दिसतं ते नसतं आणि कधी कधी समोरचं असलेली गोष्ट आपल्याला दिसत नाही. ऑप्टिकल इल्यूजन आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे फोटो आपल्याला विश्वास देतात की, जे तुम्ही बघता तेच सत्य आहे. पण ते असं नसतं. आता आम्ही असाच एक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचं आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर वाटतं की, एखाद्या झाडाखाली रंगीबेरंगी पाने पडली आहेत आणि सगळ्यांचा रंग वेगवेगळा आहे. याच पानांमध्ये एक बेडूक बसलं आहे. या फोटोत तुम्हाला ते बेडूक शोधायचं आहे. ज्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल.
या फोटोची मजेदार बाब म्हणजे यातील बेडूक पटकन दिसत नाही. फोटोत तुम्ही बघू शकता की, काही पाने लाल रंगाची आहेत तर काही पाने गुलाबी रंगाची आहेत. पण यामध्ये बेडूक पटकन दिसत नाही. पण तुम्ही जर या बेडूक शोधाल तर तुम्ही जिनिअस आहात आणि तुमची दृष्टीही चांगली आहे.
या फोटोत तुम्ही बेडूक शोधूनही तुम्हाला तो सापडला नसेल तर आम्ही एक हिंट देतो. यात बेडूक वरच्या बाजूला बसला आहे. बेडूक पानाच्या आकाराचा आहे. फोटो डाव्या बाजूला चौथ्या नंबरच्या पानाच्या जागी बेडूकच बसला आहे. बारकाईने बघाल तर लगेच दिसेल.