Find Out Wallet: मेंदुची एक्सरसाइज करण्यासाठी काही रोज ऑप्टिकल इल्यूजन क्वीज सॉल्व करणं पसंत करतात. या फोटोंची खास बाब म्हणजे हे दिसायला सामान्य असतात. पण यात गोष्टी फार चलाखीने लपवल्या जातात. हेच कारण आहे की, यात लपवलेल्या गोष्टी शोधण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. आज असाच एक कन्फ्यूज करणारा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात एका व्यक्तीचं हरवलेलं वॉलेट शोधून काढायचं आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक पुरूष आणि एक महिला डायनिंग टेबलवर डिनर एन्जॉय करताना दिसत आहेत. जेवण संपल्यावर वेटर त्यांच्याजवळ येतो. असं वाटत आहे की, वेटर बील घेण्यासाठी वाट बघत आहे. पुरूष आणि महिलेच्या चेहऱ्यावर वेगळे हावभाव दिसत आहेत.
असं वाटतं की, महिलेने मुद्दामहून पुरूषांचं वॉलेट लपवलं. अशात पुरूष खिशात वॉलेट शोधू लागतो. महिला त्याला पाहून हळून हसत आहे. आता या पुरूषाला त्याचं वॉलेट शोधण्यात तुम्हाला मदत करायची आहे. जेणेकरून त्याला बील भरता यावं. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, 10 सेकंदात तुम्ही या व्यक्तीचं वॉलेट शोधलं असेल. पण जर अजूनही तुम्हाला ते सापडलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते कुठे आहे आम्ही सांगणार आहोत.