सध्या ऑप्टिकल इल्युजन धुमाकुळ घालत आहे. अनेकजण तर अशी अशी चित्रे रेखाटत आहेत की, त्यातून तुम्हाला ते तुमचे व्यक्तीमत्व दाखवत आहेत. असाच एक फोटो आलाय ज्यात ५ फोटो लपलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला पहिला कोणता दिसतो त्यावर सारे काही अवलंबून आहे.
yourtango.com नुसार या एका फोटोमध्ये 5 चित्रे दडलेली आहेत. यापैकी कोणते छायाचित्र तुम्ही प्रथम पाहता त्यावरून तुम्हाला सामाजिक जीवनात सर्वात जास्त अस्वस्थता वाटते, ते कळणार आहे. या चित्राबद्दल लेखिका रेबेका जेन स्टोक्स म्हणतात की, जर तुम्हाला त्यात प्रथम कोणाचा चेहरा दिसला, तर तुम्ही तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने दुसऱ्याला मदत करता. पण कधी कधी तुम्ही त्यांचा आदर करत नाही, असेही वाटू शकते. केव्हा केव्हा लोकांना जसे आयुष्य हवेय तसे ते जगत नाहीएत असेही तुम्हाला वाटू शकते.
जर तुमची नजर स्त्रीकडे गेली तर, तुम्ही आपल्याबद्दल सर्व गोष्टी पटकन सांगून टाकता. यावेळी इतरांनाही मोकळेपणाने बोलायचे असते पण त्यांना तुमच्यामुळे संधी मिळत नाही. जर तुम्हाला दोन व्यक्ती झोपलेले दिसले तर, लक्षात ठेवा, शहाणा माणूस तेव्हाच बोलतो जेव्हा त्याला काही बोलायचे असते. तुम्हाला लोकांशी फार क्वचितच बोलायला आवडते, विशेषत: नवीन व्यक्तीला भेटताना.
जर तुम्हाला या फोटोत शेजारी दोन लोक उभे असलेले दिसले तर... तुम्हाला इतरांच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घ्यायला आवडते. तुम्ही लोकांना आतली गोष्ट सांगायला भाग पाडता. परंतू एक विशिष्ट अंतर ठेवले तरच नाते, मैत्री किंवा ओळख दूर काळापर्यंत टिकते.
ट्रेन दिसली तर....जर तुम्हाला सर्वात पहिली ट्रेन दिसली तर तुम्हाला लोकांबद्दल संवेदनशीलता वाटत नाही. अनेकदा तुम्ही या नादात लोकांचे मनही दुखावले असेल.