Spot 13 Faces In Viral Photo: सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सध्या फारच चर्चेत आला आहे. या फोटोत तुम्हाला 12 चेहरे शोधून काढायचे आहेत. या फोटोत काही चेहरे आहेत. ज्याला फॉरेस्ट हॅज आइज नावाने ओळखलं जातं. हे 13 चेहरे शोधण्यात तुमचं डोकं चक्रावून जाऊ शकतं. बरेच लोक या फोटोतील चेहरे शोधण्यासाठी तासंतास लावत आहेत. पण काही लोकांना लगेच यातील चेहरे दिसले.
या फोटोतील जेवढे चेहरे तुम्ही शोधू शकाल तेवढी तुमची आयक्यू लेव्हल तुम्हाला समजेल. सगळे चेहरे शोधण्याआधी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये 30 सेकंदाचा टायमर सेट करायला अजिबात विसरू नका. फोटोत तुम्हाला सहजपणे चार चेहरे दिसतील. जर तुम्हाला चेहरे दिसत नसतील तर डोकं शांत करा आणि मग पुन्हा कामाला लागा.
जर तुम्ही 10 चेहरे शोधू शकले तर तुमचा मेंदू शार्प आहे असं म्हणता येईल. जर तुम्ही 7 चेहरे शोधले तर तुम्ही एका आव्हरेज मेंदूचे मालक आहात. पण जर तुम्हाला 4 किंवा 5 चेहरे दिसले तर तुम्हाला मेंदू शार्प करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जर तुम्हाला खूप मेहनत घेऊनही चेहरे सापडले नसतील तर खाली चेहऱ्यांचे फोटो दिले आहेत.
हिरव्या झाडांच्या मधे चेहरे शोधणं फारच अवघड काम आहे. फार कमी लोक सगळे 13 चेहरे शोधू शकले आहेत. जर तुम्हीही त्यांच्यापैकी एक असाल तर तुमचा मेंदू शार्प आहे.