Social Media Viral: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोने सध्या अनेकांना चक्रावून सोडलं आहे. लोक हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहून हैराण झाले आहेत. कारण त्यांना यातील गुपित उलगडता येत नाहीये. अनेकांनी तर यातील गुपित उलगडण्यासाठी तासंतास वेळ घालवला आहे. मात्र, काही लोकांच्या तीक्ष्ण नजरेतून यातील गुपित लपू शकलेलं नाही. चला बघुया तुम्हीही यातील गुपित शोधू शकता का नाही...
या फोटोत दोन गोष्टी आहेत. एका मेंढीचा चेहरा आणि दुसरा एका पुरूषाचा चेहरा. पण हे शोधणं किंवा बघणं इतकंही सोपं नाही. जर तुम्ही फोटो फार बारकाईने बघाल तरच तुम्ही यातील इल्यूजन सॉल्व करण्यात यशस्वी व्हाल. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये काही सेकंदाचा टायमर लावा.
तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला एक मेंढीचा चेहरा दिसेल. पण दुसरा मनुष्याचा चेहरा शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण ते काही सोपं काम नाही. तसं अवघडही नाही. फक्त तुमची नजर तीक्ष्ण असली पाहिजे. आधी तुम्ही फोटो वरपासून खालपर्यंत व्यवस्थित बघा. तरच तुम्हाला यातील गुपित कळेल.
या ऑप्टिकल इल्यूजनला बघितल्यानंतर यातील गुपित सॉल्व करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे तुम्ही जोर लावून यातील गुपित शोधू शकता. त्यातून तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हेही कळेल.