आपल्याला बाहेरच्या शहरात शिक्षणासाठी गेल्यानंतर राहण्याची सोय महत्वाची लागते. यासाठी आपण होस्टेल किंवा रुम भाड्याने घेत असतो. यासाठी रुमच्या मालकांचे काही नियम असतात. सध्या एका घरमालकाचे असेच नियम व्हायरल झाले आहेत. सरकारी किंवा खासगी नोकरी किंवा इतर व्यावसायिक कामात हायस्कूल किंवा इंटरमिजिएटच्या गुणांचे महत्त्व तुम्ही पाहिले असेलच. दिल्ली विद्यापीठ किंवा IIM सारख्या संस्थांमध्ये, कटऑफ ९९% पर्यंत जातो. दरम्यान, एका घरमालकाने फक्त टक्केवारी कमी असल्याने भाडेकरूला घर देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भातील सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होत आहेत. त्यानुसार आता रुम मिळवण्यासाठीही प्रवेश परीक्षा द्यावी लागेल, असं यात लिहिलं आहे.
Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड...
सोशल मीडियावर पोस्ट टाकून एका व्यक्तीने आपला आक्षेप सांगितला आहे. त्याने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या व्यक्तीचा दावा आहे की बंगळुरूमध्ये फक्त मार्क्स कमी असल्याने त्याला रुम मिळू शकली नाही. अहवालानुसार, ज्याचे मार्क्स ९०% होती त्या व्यक्तीला घरमालक आपली खोली देऊ इच्छित होता. भाड्याने खोली शोधत असलेल्या या व्यक्तीची संख्या ७५% होती, म्हणून त्याला रुम नाकारण्यात आली.
ब्रोकरसोबत शेअर केलेल्या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये ब्रोकरने आधार कार्ड आणि पॅन कार्ड तसेच १०वी आणि 12वीची मार्कशीट मागितली होती. एवढेच नाही तर घरमालकाने भाड्याने खोली घेणाऱ्या व्यक्तीला आपला परिचय लेखी पाठवण्यास सांगितले होते. नंतर ब्रोकरने मेसेजवरच सांगितले की मार्क्स कमी असल्याने घरमालकाने रुम देण्यास नकार दिला आहे.
यावर नेटकरी सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, 'मित्रा, मला फक्त ५६% मार्क्स आहेत, मी रस्त्यावरच राहीन.' दुसर्या युजरने लिहिले की, 'आता भाड्याने घेतलेल्या खोल्यांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा सुरू करावी लागेल असे वाटते.'