शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
2
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
3
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
4
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
5
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
6
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
7
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
9
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
10
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
11
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
12
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
13
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
14
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
15
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
16
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
17
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
18
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
19
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
20
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम

Jasprit Bumrah, Pakistan vs England Test: आयला! पाकिस्तानमध्ये दिसला 'छोटा बुमराह'; Viral Photo पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 3:43 PM

त्या छोट्या मुलाचे स्टेडियममधील काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Jasprit Bumrah, Pakistan vs England Test: मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनेपाकिस्तानचा २६ धावांनी पराभव केला आणि दुसरा कसोटी सामना जिंकला. या विजयाबरोबरच त्यांनी तीन सामन्यांची कसोटी मालिकाही जिंकली. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात अनेक रोमांचक क्षण क्रीडारसिकांना पाहायला मिळाले. स्टेडियममध्येही चाहत्यांची गर्दी झाल्याचे दिसले. मात्र, हा कसोटी सामना संपताच चाहत्यांना जसप्रीत बुमराहची आठवण झाली.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहसारखा दिसणारा एक छोटा मुलगा दिसला. या मुलाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. तुम्ही हे फोटो पाहिलेत तर तुमचाही विश्वास बसणार नाही की हे खरोखर घडलं असेल.

बुमराहसारखा दिसणारा हा मुलगा पाहून तुम्हाला वाटेल की बुमराह लहानपणी असाच दिसला असेल. सध्या बुमराहसारखा दिसणारा हा मुलगा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहकडूनही काही प्रतिक्रिया येते की नाही हे पाहणे याचे चाहते वाट पाहत आहेत.

दुसरीकडे, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात पाकिस्तानचा संघ २६ धावांनी दूर राहिला. घरच्या मैदानावर सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभव स्वीकारावाल लागला. त्यामुळे त्यांनी मालिकेतील दुसरी कसोटी गमावली. या मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तानी संघ आणि कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका होत आहे. बाबर आझम घरच्या मैदानावर मालिका जिंकू शकत नसेल तर त्याने कर्णधारपद सोडावे, असे चाहते संतप्तपणे म्हणाताना दिसत आहेत.

 

टॅग्स :jasprit bumrahजसप्रित बुमराहEnglandइंग्लंडPakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडिया