Deadly Viral Video: जेव्हा एका गिर्यारोहक आपल्या प्रवासाला निघतो तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना केवळ डोंगरावर चढायचच नसतं तर अनेकदा जीवघेण्या दुर्घटनांचाही सामना करावा लागतो. भयंकर थंडीत त्यांना आव्हान स्वीकारत पुढे जावं लागत असतं. अनेकदा तर अशाही घटना घडतात ज्यात त्यांचा जीव जाणार असतो, पण सुदैवाने ते वाचतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक गिर्यारोहक मरता मरता वाचलाय.
एका गिर्यारोहकासमोर ते डोंगर चढत असताना प्रवासात अनेक अडचणी असतात. तसं तर हे कुणालाच माहीत नाही की, कुणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल. पण जेव्हा मृत्यू समोर दिसतो तेव्हा लोक आपला जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. अशा घटना पाहिल्या की, आपल्या समजतं की, जीवनाचा काही भरोसा नाही. हेच दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओला 'फ्लाइंग किस ऑफ डेथ' म्हटलं जात आहे.
हा व्हिडीओ itshimalayas नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात पाकिस्तानच्या स्पांटिकमध्ये ७ हजार फूट उंची असलेल्या डोंगरावर काही गिर्यारोहक चढत होते. ते एका विशाल डोंगराखाली टेंट लावून आराम करत होते. तेव्हाच अचानक काही मोठे दगड वरून खाली पडत होते. खाली असलेल्या लोकांना आधी याची कल्पना नव्हती. ते त्यांच्या कामात बिझी होते.
तेव्हाच एक मोठा दगड टेंटच्या बाजूने जातो. यावेळी तिथे दोन व्यक्ती बसलेले असतात. त्यातील एक व्यक्ती लगेच तिथून बाजूला होतो. पण दुसऱ्या व्यक्ती फार जवळून हा दगड जातो. म्हणजे ही व्यक्ती थोडक्यात मरता मरता वाचली. तो जराही पुढे आला असता तर जागीच ठार झाला असता. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.