गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तान जवळील आता विदेशी मुद्राही संपत आली आहे. पाकिस्तानी रुपयाची किंमत २६५ रुपये प्रति डॉलर पर्यंत आले आहे. एकीकडे पाकिस्तानचे विद्यमान सरकार शेहबाज शरीफ यांच्यावर यावरून टीका होत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावरही नेटकरी पाकिस्तानच्या या अवस्थेची खिल्ली उडवत आहेत. आता पाकिस्तानने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक विक्रम मोडल्याबद्दल नेटकरी पाकिस्तानला ट्रोल करत आहेत.
रोहित शर्माने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यात वनडे इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळली होती. या डावात त्याने २६४ धावा केल्या. रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक दुहेरी शतके आहेत. आता पाकिस्तानी रुपयाचे मूल्य २६४ पार करून २६५ वर पोहोचले आहे, त्यानंतर नोटकऱ्यांनी या प्रकरणावर पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
चारा म्हणून ठेवलेला कोंबडा चोरायला गेला आणि बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकला; पाहा Video...
ट्विटरपासून इंस्टाग्रामपर्यंत नेटकऱ्यांनी पाकिस्तानी रुपयाने २६५ रुपयांचा आकडा पार केल्याबद्दल मजेशीर पोस्ट्स केल्या आहेत. या ट्विटच्या माध्यमातून युजर्सनी पाकिस्तानची खूप खिल्ली उडवली आहे.
पाकिस्तान गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड देत आहे. पाकिस्तानमध्ये पीठ आणि डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. आयएमएफ आणि मूडीजसह अनेक संस्थांनी पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब असल्याचे वर्णन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये अनेक गुंतवणूक करणाऱ्या चीननेही पाकिस्तानच्या मदतीने हात आखडता घेतला आहे.