नवी दिल्ली : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2022) देशभर आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियाचा (Social Media) रंग देखील तिरंगा झाला असून देशभरातील लोक या अमृत महोत्सवात सहभागी झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एका पाकिस्तानी कलाकाराने भारतीयांना अप्रतिम भेट दिली आहे, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानी कलाकार सियान खानने (Pakistani Rabab Artist Siyal Khan) खास अंदाजात भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सियालने जन गण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत (National Anthem) आपल्या गिटारच्या साहाय्याने सादर केले आहे. व्हिडिओ शेअर करताना सियाल खानने आपल्या ट्विटरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, सीमेपलीकडील माझ्या प्रेक्षकांसाठी ही भेट आहे.
पाकिस्तानी कलाकाराने जिंकली मनेव्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सियाल उंच डोंगराळ भागात बसला आहे. एकूण एक मिनिट आणि २२ सेकंदाच्या या व्हिडीओने अनेकांच्या मनात जागा केली आहे. सियालने ज्या अंदाजात जन-गण-मन हे राष्ट्रगीत सादर केले ते पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला ६ लाख ४६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सुमारे ४० हजार एवढ्या लाईक्सचा वर्षाव झाला आहे. सियालने सीमेपलीकडील प्रेक्षकांना अर्थात भारतीयांना या व्हिडीओद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १४ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तानचा ७५ वा स्वातंत्र्यदिन पार पडला.
देशभर अमृत महोत्सवाचा जल्लोषभारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. या दरम्यान विविक्ष क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो बदलून या मोहिमेत सहभाग नोंदवला.