Karl Rock नावाचा एक फेमस यूट्यूबर आहे. त्याचे व्हिडीओ चांगलेच गाजत असतात. नुकताच त्याने पाकिस्तानातील एक व्हिडीओ रिलीज केला आहे. यात एक ११ वर्षांचा मुलगा भारताबाबत काही चांगल्या गोष्टी बोलताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या मुलाचं नाव आहे जकियास. व्हिडीओत तो सांगतो की, तुम्ही त्याला जॅकही म्हणू शकता. दोघेही लाहोरच्या एका फूड स्टॉलमध्ये भेटतात. जॅक रॉकला तो जेवणही ऑफर करतो. नंतर दोघे पाकिस्तानी पदार्थ आणि सभ्यतेवरही बोलतो.
जेव्हा रॉकने या मुलाला भारताबाबत विचारलं तर तो म्हणाला की, 'चांगले आणि वाईट लोक प्रत्येक ठिकाणी असतात. त्यामुळे आपण कुणालाही जज करू शकत नाही'. तेव्हा रॉक म्हणतो की, 'हो...हे खरंय'. व्हिडीओत रॉक हेही सांगतो की, तो पाकिस्तानात अशा अनेक लोकांना भेटला ज्यांनी भारत पाहिला. पण भारतात अशा लोकांना नाही भेटला ज्यांनी पाकिस्तान पाहिलाय.
कार्ल रॉक हा स्वत: न्यूझीलॅंडचा आहे. त्याने एका भारतीय मुलीसोबत लग्न केलंय. तो फेमस यूट्यूबर असून वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील चांगल्या गोष्टी, खासियत दाखवत असतो. त्याचा हा नवा व्हिडीओ सध्या चांगलाच गाजतोय कारण त्यात भारत-पाकिस्तानविषयी बरंच बोलला आहे.