पाकिस्तानच्या प्रसिद्ध कॅफेमध्ये एका दोन महिला मालकिणींनी आपल्या मॅनेजरच्या इंग्लिशची चांगलीच खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या दोघींनीही या मॅनेजरची माफी मागितली आहे. या १८ सेंकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या महिलांनी स्वतःच विषय काढत मॅनेजरला अपमानित केलं आहे.
इस्लामाबामध्ये एक कॅफे कॅनोली आहे. नऊ वर्षांपासून तिथे असलेल्या कॅफे मॅनेजरला या महिला इंग्रजी बोलण्यास सांगतात. त्यानंतर या दोघींनाही हसायला येतं. कारण मॅनेजरला फारसं इंग्रजी बोलतान येत नव्हतं आणि या दोन महिला त्याच्या मनाविरुद्द त्याला ही गोष्ट करायला लावतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलांवर सोशल मीडियावर या दोन्ही महिलांवर कडक टीका झाली आणि ती टिका पाकिस्तानमधील # बॉयकोटकॅनोली ट्रेंड बनली.
व्हिडिओमध्ये उज्मा आणि दीयाने मॅनेजर अवेस यांनी त्यांच्याबरोबर नऊ वर्षे काम केल्याचे सांगितले. दीया विचारते, 'आपण इंग्रजीसाठी किती वर्ग घेतले?' दीड वर्षाच्या कालावधीत तीन इंग्रजी अभ्यासक्रमांचा अभ्यास केल्याचे अवेसने उत्तर दिले.
उज्मा म्हणते, ''कृपया तुम्ही सर्वांशी इंग्रजीत बोलू शकता का? स्वतःबद्दल सगळ्यांना इंग्रजीत सांगा.' विनंतीनंतर मॅनेजर तोडकी मोडकी इंग्रजी बोलू असताना एक महिला हसताना दिसत आहेत. त्यातील एक महिला गमतीशीर स्वरात म्हणते, 'हे सुंदर इंग्रजी बोलताहेत.' मग दुसरी बाई म्हणते, 'आम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत.' हृदयद्रावक! हत्तीला अखेरचा निरोप देताना जवानाला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ
व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, 'हे खूप वाईट आहे. वर्ग विशेषाधिकार, वसाहती आणि पाकिस्तानी अभिजात वर्गांचे वर्चस्व... सर्व एकाच क्लिपमध्ये. इथला मॅनेजर हिरो असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या कठोर परिश्रमांना सलाम.' कमला हॅरिस यांनी शपधविधीसाठी निवडलेला जांभळा ड्रेस कोणी डिजाईन केलाय माहित्येय का?