पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार नेहमीच सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत असतात. चांद नवाब या पत्रकारने सोशल मीडियाच अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याची लोकप्रियताही भरपूर आहे. पण त्याच्यासारखेच आणखीही आहेत. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने गाढवावर बसून रिपोर्टिंग केलं होतं. आता आणखी एक पत्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा पत्रकार थेट पूर आलेल्या नदीच्या मधोमध जाऊन रिपोर्टिंग करतो आहे.
पाकिस्तानातील दुसरे एक पत्रकार नैला इनायत यांनी एक व्हिडीओ ट्विटर शेअर केला आहे. यात एक पाकिस्तानी पत्रकार पूर आलेल्या क्षेत्रातील एका नदीच्या मधोमध उभा पाहून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. त्याचा रिपोर्टिंगचा अंदाजही अनोखा आहे.
आता या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेदार कमेंट येत आहेत. यावर एका महिलेने कमेंट केली की, या पत्रकाराला शोध पत्रकारितेसाठी पुलिज्झर पुरस्कार मिळायला हवा. रिपोर्टिंग करताना तो सांगतो आहे की, या परिसरात झालेल्या पुरामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या होऊ शकते.