सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. रातोरात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होऊन सेलिब्रेटी बनलेले अनेकांना पाहिलं असेल. सध्या आम्ही तुम्हाला एका कुल्फीवाल्याबाबत सांगणार आहोत. हा काही साधा कुल्फी वाला नाही हो, तर चक्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना.. पण थांबा हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा एक सामान्य व्यक्ती आहे.
पाकिस्तानमधल्या या कुल्फीवाल्याचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. सलीम नावाच्या या कुल्फीवाल्याचा आवाजही चांगला आहे पण त्याचसोबत तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. सलीमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो पाहून अनेकांनी त्याला ट्रम्प म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. २० वर्षाच्या हॅरिस अलीने सांगितले की, २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानात आले होते. त्यानंतर आम्ही सलीमला ट्रम्प बोलावू लागलो. त्याचा चेहरा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळताजुळता आहे.
ट्रम्प यांच्या एँन्टी मुस्लीम भूमिकेनेही भलेही पाकिस्तानात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वादग्रस्त व्यक्ती आहेत. तरीही सलीमला ट्रम्प म्हटल्याने तोदेखील खुश होतो. अलीने सांगितले की, सलीम कुल्फीवाल्याला आम्ही लहानपणापासून बघतोय. आम्ही जेव्हा त्यांना ट्रम्प म्हणून हाक मारतो तेदेखील आनंदी होतात. सलीम ट्रम्प यांचा डुप्लिकेट असल्याने चर्चेत आहे. परंतु त्याचसोबत तो जेनेटिक कंडिशनमुळे त्रस्त आहे. सलीम हा एल्बीनिस्म या आजाराचा सामना करत असल्याचं त्याने एका मुलाखतीत म्हटलं आहे.
जेनेटिक कंडीशन असं आहे ज्यात माणसाच्या शरीराची त्वचा पांढरी होऊ लागते. तर उन्हामध्ये गेल्यास त्वचेमुळे अनेकदा त्रास सहन करावा लागतो. या आजारामुळे सलीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुल्फी विकून घर चालत असल्याने त्याला उन्हामध्येच बाहेर पडावं लागतं. त्याचा आवाजही मस्त आहे.सध्या सलीम सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने तो आनंदात आहे. २००९ मध्ये एका स्टडीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एल्बीनोचा मोठा समुदाय आहे. त्यांना वारंवार नोकऱ्यांमध्ये भेदभाव सहन करावा लागतो. सलीम याचा आवाज आणि ट्रम्प यांचासारखा दिसत असल्याने तो लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागला आहे.