Viral Video : भारतात प्रामुख्याने ९ ते ५ शिफ्टमध्ये काम करणारा कॉर्पोरेट कर्मचारी म्हणजे सर्वात सुखी माणूस, असा अनेकांचा समज आहे. मात्र, हा समज एका पाणीपुरीवाल्याने फोल ठरवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मुंबईसारख्या गजबजलेल्या, धावत्या शहरात अनेकांची स्ट्रीट फुडला पसंती असते. कुठेही सहज उपलब्ध होणारे स्ट्रीट फूड खायला प्रत्येकाला आवडते. त्यात पाणीपुरी हा अनोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पण तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीवाल्याच्या उत्पन्नाबद्दल तुमच्या मनात कधी विचार आलाय का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये पाणीपुरीवाल्याच्या उत्पन्नाबाबत खुलासा करण्यात आला आहे.
एखाद्या बाजारपेठेत, रस्त्यांच्या कडेला ठेला लावून पाणीपुरीचा धंदा करणाऱ्या विक्रेत्याची दिवसाची कमाई किती असते? यातून त्यांना फायदा होतो की तोटा? याबाबत माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पाणीपुरीवाल्याला त्याच्या उत्पन्नाबद्दल प्रश्न विचारण्यात येतो. हा पाणीपुरी विक्रेता अगदी सहजतेने त्याच्या कमाईचा हिशोब मांडतो. त्याच्या या उत्तराने नेटिझन्स चकीत झालेत.
पाणीपुरीवाला दिवसाला साधारणत: २ हजार ५०० रुपये कमावत असल्याचे तो सांगतो. तर महिनाभरात त्याची ७५ हजार रुपये इतकी कमाई होते. या पाणीपुरी विक्रेत्याची कमाई ऐकून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्याच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवाय या पाणीपुरी विक्रेत्याचा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय बनलाय.
येथे पाहा व्हिडीओ :