सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे .ज्यामध्ये पोपट ट्रॅफिक कॅमेऱ्यावर फोटोबॉम्बिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘कॅसी’ नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याला आतापर्यंत १ हजार ३०० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कुठूनतरी उडत उडत हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसला. आणि त्याला या कॅमेऱ्यात काहीतरी विशेष वाटले, म्हणून तो कॅमेऱ्यात सारखं डोकावताना आपण पाहू शकतो.
ब्राझिलमध्ये रस्त्यांवरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर एक पोपट अचानक खोडसाळ पद्धतीने कॅमेऱ्यात वाकुन बघताना दिसला. आधी हा पोपट या कॅमेऱ्यावर येऊन बसतो आणि नंतर त्याला कॅमेऱ्यात काहीतरी विशेष असल्याचं जाणवतं. तेव्हा तो वारंवार कॅमेऱ्यासमोर पाहत राहतो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. १३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक पोपट डोके उलटे करून कॅमेरामध्ये डोकावताना दिसत आहे. कदाचित या पोपटाला कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये स्वत:चाच चेहरा दिसत असल्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच पोपट सारखा या कॅमेऱ्यात डोकावून पाहाताना दिसतो.
तुम्ही ट्रॅफिक पाहत असताना, पुढच्याच क्षणी एक पोपट अचानक कॅमेऱ्याचे दृश्य ब्लॉक करतो. या पोपटाची मान आणि मोठ मोठे डोळे कॅमेऱ्यासमोर येतात. सर्वात मजेदार गोष्ट तेव्हा घडते जेव्हा पोपटाचा चेहरा, त्याच्या मोठ्या डोळ्यांनी, कॅमेरामध्ये काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. तो पुन्हा कॅमेराच्या लेन्ससमोर येतो. हा पोपट या कॅमेऱ्यात काहीतरी शोधण्याचाच प्रयत्न करत असल्याचं आता नेटकरी म्हणत आहेत.