कोरोना व्हायरसचं नाव ऐकून सुद्धा लोक घाबरत आहेत. कारण कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या व्हायरसच्या नावाने थरकाप उडून लोक काहीही करायला तयार होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण असा एक व्हिडीओ समोर आला आहे.
इंडोनिशियातील समुद्रात अशीच एक भयानक घटना घडली आहे. इंडोनेशियातील समुद्रात एक बोट २५५ पर्यटकांना घेऊन चालली होती. तेव्हा त्या बोटीत कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाल्याने खूप गडबड झाली. जीव वाचवण्याच्या भीतीने लोकांनी समुद्रात उड्या मारल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत बोटीतले लोक कोरोनाग्रस्ताला घाबरून बोटीतून उड्या मारताना दिसत आहेत. ही बोट बोर्नियोहून सुलावेसीकडे ही बोट जात होती. मात्र सुलावेसी प्रशासनाने कोरोनामुळे बोटीवरील लोकांना बंदरात उतरण्यास परवानगी नाकारली. तेव्हाच बोटीवर कोरोनाग्रस्त असल्याची अफवा पसरली. समुद्रात उडी मारलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लगेच लाइफ जॅकेट टाकण्यात आली. या प्रकारानंतर इंडोनेशियाच्या प्रशासनाने बोटीला बंदरात थांबवण्यास परवानगी दिली.