नवी दिल्ली - सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ व्हारल असतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आनंदीत झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये मोरांचे एक कळप माता सरस्वतीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. सध्या इंटरनेटवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण आपल्या ट्विटर,व्हॉट्सअॅप आणि फेसबूक अकाऊंटवरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
या व्हिडीओमध्ये एका छप्परावर सरस्वतीची मूर्ती दिसत आहे. तिथे तीन मोर फिरताना दिसत आहेत. काही वेळात हे मोर सरस्वतीच्या मूर्तीजवळ येतात आणि मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करतात. हा व्हिडीओ ट्विटर युझर @Itishree001 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. तसेच हा व्हिडीओ जर्मनीमधील श्री पीठा निलय आश्रमामधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
असं सुंदर आणि मनमोहक दृश्य, सनातनची शक्ती. मोर माता सरस्वतीला प्रदक्षिणा घालताना, असे हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे. हा व्हिडीओ 4 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 81 हजार हून अधिक वेळा हा व्हिडीओ लाइक्स करण्यात आला आहे. तसेच 13 हजारांहून अधिक लाइक्स आणि अडीच हजारांहून अधिक रिट्विट आले आहेत. तसेच अनेक कमेंट्सही आल्या आहेत.