मासिक पाळी प्रत्येक महिलेच्या आयुष्यात महत्वाची असते. याकालावधीत अनेक महिलांना प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. काही जणाींसाठी तर मासिक पाळी आल्यावर इतर कामं करणं कठीण होऊन जातं. अनेकदा स्त्रीयांच्या या काळातल्या वेदनांकडे इतरांकडून दुर्लक्ष केलं जातं. अनेक घरांमध्येही महिलेला समजून घेतलं जात नाही. स्त्रिया कमकुवत असतात. असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर काही तरूणांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मासिक पाळीत स्त्रियांना किती वेदना होतात, याचा कृत्रिम अनुभव देणाऱ्या यंत्राबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर (Period Cramp Stimulator) असं या यंत्राचं नाव असून मित्र-मैत्रिणींनी या यंत्रावर वेदनांचा अनुभव घेतल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेदनांचा अनुभव कसा वेगवेगळा आहे, हे यात दिसतं आहे. 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुरुष पहिल्यांदाच पीरियड क्रॅम्पचा (Period Cramp) अनुभव घेत असल्याचं दिसतं. वेदनांची तीव्रता इतकी असते, की तो अक्षरशः जमिनीवर पडतो. त्यानंतर तो माणूस लगेचच हे यंत्र बंद करायला सांगतो.
कोरोनाचा असाही फायदा! घटस्फोटासाठी अर्ज केलेल कपल पुन्हा सोबत रहायला तयार...
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. स्त्रियांची मासिक पाळी किती वेदनादायी असते, याबद्दल जागृती करणं हा व्हिडिओचा उद्देश आहे. नेटिझन्सनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.