इमरती 'देवी' तर कमलनाथ 'महिषासूर', 'आयटम'वादावर "तो" फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:34 PM2020-10-20T12:34:59+5:302020-10-20T12:43:55+5:30

Kamalnath And Imarti Devi : 'आयटम'वादावरून सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये इमरती देवींना 'देवी' तर कमलनाथ यांना 'महिषासूर' बनवले

photo of kamalnath and imarti devi got viral as demo mahishasur and goddess durga | इमरती 'देवी' तर कमलनाथ 'महिषासूर', 'आयटम'वादावर "तो" फोटो व्हायरल

इमरती 'देवी' तर कमलनाथ 'महिषासूर', 'आयटम'वादावर "तो" फोटो व्हायरल

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणिपोटनिवडणुकीतील उमेदवार इमरती देवी यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयटम असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. अनेकांनी कमलनाथांवर जोरदार निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर देखील या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. 'आयटम'वादावरून सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये इमरती देवींना 'देवी' तर कमलनाथ यांना 'महिषासूर' बनवले

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये इमरती देवी यांना देवीच्या (महिषासूर मर्दिनी) रुपात दाखवण्यात आले आहे तर देवीच्या पायाजवळ कमलनाथ यांना महिषासुराच्या रुपात दाखवण्यात आले आहे. डबरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर आरोप करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची जीभ घसरली. इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना आयटम असे संबोधले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

कमलनाथ यांनी स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा केला बचाव 

कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे. "जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं. 1. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं. 1. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत म्हणून" असं कमलनाथ यांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं आहे. 

"आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो"

कमलनाथ पुढे म्हणाले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सारे काही सुरू आहे. तेच त्यांचे लक्ष्य आहे. आता त्यांनी जनतेसमोर जावं आणि आपल्या पंधरा वर्षांचा आणि सात महिन्यांच्या हिशोब द्यावा, असे आव्हानही कमलनाथ यांनी दिले.

Web Title: photo of kamalnath and imarti devi got viral as demo mahishasur and goddess durga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.