जग्वार हा अमेरिका खंडात आढळणारा मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी चित्ता आणि बिबळ्या यांसारखा ठिपकेदार असतो. Hebert Van Der Beek या फोटोग्राफरने जग्वारचे कमाल फोटो क्लिक केलेत. हे फोटो त्यांनी गेल्यावर्षी काढले होते. हे फोटो पुन्हा एकदा ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत आणि त्यांना प्रश्न पडला आहे की, पाण्याखाली जग्वारचे फोटो क्लिक कसे केले असतील?
हे फोटो @ScienceIsNew नावाच्या पेजवर ट्विट करण्यात आले आहेत. कॅप्शनला लिहिले आहे की, 'फोटोग्राफरने काही दुर्मीळ क्षण कॅमेरात कैद केले आहेत. फोटोत जग्वार पाण्याखाली शिकार जेवण पकडताना दिसत आहे'. पण यावेळी जग्वारचे हावभाव पाहून बघणाऱ्याला हे कळून येतं की, 'मृत्यू' काय असतो. या फोटोंना आतापर्यंत १.७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ३०० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.
फोटोग्राफर Herbert ला इन्स्टाग्रामवर ४१ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ते जगभरात वाइल्ड फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. तुम्हालाही वाइल्ड फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्हीही यांचा दृष्टीकोन नक्कीच बघू शकता.