निसर्गाला समजणं, जाणून घेणं हे आयुष्यभर सुरुच राहतं. कारण या निसर्गात असं खूपकाही आहे ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. आणि अचानक असं काही माहीत होतं जे जाणून घेतल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ फुलाची चर्चा सुरु आहे.
या फुलाबाबत महत्त्वाची बाब म्हणजे हे फूल ७ ते १० वर्षात केवळ एकदाच उमलतं आणि तेही काही तासांसाठीच. सध्या हे फूल कॅनडातील एका प्राणी संग्रहायलयात फुललं असून ते बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.
या सुंदर आणि सर्वात दुर्मिळ फुलाला 'कॉर्प्स फ्लॉवर' किंवा 'एमोर्फोफॅलस टायटेनम' नावाने ओळखलं जातं. हे फूल इंडोनेशियातील सुमात्रा व्दीपवर आढळतं. या लाल रंगांच्या फुलाची उंची ८ ते १० मीटर असू शकते. यातून सुंगध तर नाही कच्च्या मांसासारखा गंध येतो.
हे खास फूल कॅनडातील टोरांटो प्राणी संग्रहालयात फुललं आहे. जे बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. रिपोर्ट्नुसार, हे फूल ८ ते ३६ तासांसाठीच फुलतं. सध्या सोशल मीडियात या फुलाचे फोटो शेअर करुन त्याची खासियत सांगितली जात आहे.