जगभरातून अजूनही कोरोना व्हायरसचं थैमान थांबायचं नाव घेत नाहीये. आता लोक कोरोनासोबतच जगण्याची तयारी करत आहेत. मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं जात आहे. चीनच्या वुहानमधून हा व्हायरस जगभरात पसरला आणि हा व्हायरस वटवाघळातून पसरला असाही दावा केला जातो. पण याबाबत काहीही ठोस असं समोर आलेलं नाही. अशात सोशल मीडियावर एक वटवाघळाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. असा दावा केला जातोय की, हे इतक्या मोठ्या आकाराचं वटवाघूळ फिलिपिन्समध्ये आढळलंय. हा फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.
ट्विटरवर @AlexJoestar622 नावाच्या यूजरने 24 जून रोजी हा वटवाघळाचा फोटो शेअर केलाय. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'आठवतंय ना जेव्हा सांगितले होते की, फिलिपिन्समध्ये मनुष्याच्या आकाराचे वटवाघूळ आहेत. हे तेच आहे ज्याबाबत मी बोलत होतो'. हा फोटो 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केलंय आणि 2 लाख 61 हजारापेक्षा अधिक याला लाइक्स मिळाले आहेत.
एका यूजरने सांगितले की, 'आकाराने मोठ्या या वटवाघळाचे पंख फार मोठे आहेत. पण त्याचं शरीर छोटं आहे. हे वटवाघूळ फक्त फळं खातं. खासकरून पेरू'.
वटवाघळाच्या या फोटोवर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकजण हा फोटो पाहून हैराण झाले तर काही लोक याला केवळ एक फोटो ट्रिक मानत आहेत. पण फोटो शेअर करणाऱ्या यूजरचा दावा आहे की, हे वटवाघूळ 6 फुटाचं आहे. असो, पण तुम्ही कधी इतकं मोठं वटवाघूळ पाहिलंय का?
Memes : समजा आपला 'हेराफेरी'चा 'राजू' केबीसीमध्ये गेला तर काय होईल? जे होईल ते तुम्हीच बघा....
Viral Video : बघा हरणाच्या चलाखीसमोर सिंहाचा झाला 'पोपट', कंट्रोल नसेल तर पॉवरचा काय फायदा!