प्राणी हे मनुष्यांपेक्षा जास्त मदत करणारे आणि प्रामाणिक असतात हे आपण सगळेच नेहमीच अनुभवत असतो. कारण ते कुणाचीही मदत करण्याआधी विचार करत बसत नाहीत. असाच एक मनुष्यांनी शिकावा असा नजारा आशियातील बोर्निया जंगलात बघायला मिळाला. बोर्निया जंगलातील हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोत एक Orangutan नदीत पडलेल्या एका व्यक्तीला बाहेर येण्यासाठी मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.
Orangutan ने मदतीसाठी जे केलं ते लोकांना फारच आवडलंय आणि लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. यातील काही ट्विट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हा फोटो अनिल प्रभाकर नावाच्या एका फोटोग्राफरने क्लिक केलाय. याबाबत त्यांनी सांगितले की, ते सगळेच जंगलात सफारीसाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत Borneo Orangutan Survival Foundation मध्ये काम करणारे काही कर्मचारी होते.
हे कर्मचारी Orangutans ची घरं सुरक्षित आहेत की नाही याची काळजी घेतात. दरम्यान त्यातील एकाला माहीत होते समोर येणाऱ्या नदीत विषारी साप आहेत. त्यामुळे ती व्यक्ती Orangutans ना रस्त्यातून हटवण्यासाठी नदीतील पाण्यात उतरली. त्याला नदीतील साप बाजूला करताना पाहून Orangutan त्याच्या जवळ गेला.
त्या कर्मचाऱ्याला बाहेर येता यावं म्हणून Orangutan त्याचा हा मदतीसाठी पुढे केला होता. पण कर्मचाऱ्याने त्याची मदत घेतली नाही. कारण Orangutan वागणं त्याला माहीत नव्हतं आणि एका अनोळखी प्राण्याकडून मदत घेणं त्याला योग्य वाटलं नाही.
काही असो Orangutan ने मदतीसाठी हा पुढे हीच किती मोठी आणि मनाला भिडणारी बाब आहे. म्हणजे आज जिथे एकमेकांचा जीव घेण्यासाठी मनुष्य आसुसलेले असताना हा प्राणी खूप काही शिकवून जातो.