वातावरण फारच बिघडलेलं होतं, जोरदार हवा सुरू होती. रस्त्यावर चालणंही कठीण झालं होतं. अशा वातावरणात विमान उडवणं आणि ते जमिनीवर उतरवणं फारच कठीण काम असतं. पण ब्रिटनच्या ब्रिस्टल एअरपोर्टवर एक फारच आश्चर्यकारक घटना घडली. इथे एक विमान लॅन्ड करण्यात आलं, तेही वादळात. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आणि लोकांकडून पायलटची कौतुक केलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना १२ ऑक्टोबरची आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, 'टीयूआय एअरवेज प्लेन' लॅंडिंगसाठी रनवेकडे येत आहे. वेगवान वाऱ्यामुळे विमानाचा संतुलन बिघडलं आहे. पण पायलटने आपल्या हुशारीने प्लेन सुरक्षितपणे जमिनीवर उतरवलं.
रिपोर्ट्सनुसार, विमान सुरक्षितपणे लॅन्ड करण्यासाठी पायलेटने विमान वेगळ्या डायरेक्शनला नेले. जर वादळासोबत लॅंडिंग केलं असतं तर फार जास्त नुकसान झालं असतं. सद्या या वादळाने ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.