नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी मोठ्या उत्साहात तयारी केली होती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण दारु पितात. अशीच काल एक पार्टी सुरू होती. पार्टी ज्या ठिकाणी सुरू होती, तिथून एक साप गेला. यातील एका तरुणाने नशेत त्या सापाला पकडले. तो त्या सापासोबत खेळू लागला. यानंतर त्या सापाने त्या तरुणाला दंश केला, यात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साप अतिशय विषारी होता.
ही घटना तामिळनाडूतील तिरुपतीरिपुलियुरमध्ये घडली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाची पार्टी सुरू असताना ही घटना घडली. मणिकंदन असं त्या तरुणाचे नाव आहे. तो नशेत असताना त्याला एक साप झाडीत जात असल्याचे दिसले. सापाला पाहून मणिकंदनने साप पकडला आणि उचलले.यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला साप पकडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने ऐकले नाही.सापाला उचलून तो मित्रांना भिती घालू लागला.
मणिकंदनला ना साप चावू शकतो हे समजले ना त्याला सापापासून इतर लोकांना काय धोका आहे हे समजले. पण आजूबाजूच्यांचे न ऐकल्याचा परिणाम त्याच्यासाठी घातक ठरला. काही वेळाने सापाने त्याला दंश केला.
महिला प्रशिक्षकाचा विनयभंग; भाजपाच्या क्रीडा मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
साप चावल्यानंतरही मणिकंदनला मस्ती करतच होता. ही माझी नवीन वर्षाची भेट असल्याचे त्याने मित्रांना सांगितले. पण यावेळी वेळ निघून गेली होती, मणिकंदन बेशुद्ध अवस्थेत खाली पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यावेळी मणिकंदनच्या मित्राने त्या सापामध्येपकडून सोबत घेतले. जेणेकरून साप किती विषारी आहे हे डॉक्टरांना दाखवता येईल. पण, हॉस्पिटलमध्ये सापाने मणिकंदनच्या मित्रालाही दंश केला. त्या तरुणाचीही प्रकृतीही गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा साप अत्यंत विषारी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा साप रसेलच्या व्हायपर प्रजातीचा होता.