सोशल मीडियावर काही दिवासांपूर्वी मिझोरामच्या एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ही चिमुरडी वंदे मातरम हातात राष्ट्रध्वज घेऊन म्हणत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षांच्या मुलीने गायलेल्या वंदे मातरमच्या गाण्यामुळे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे शनिवारी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टमध्ये तिचे कौतुक केले आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी हा या मुलीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
एस्टर हॅन्मेटे या मुलीने एक सुंदर फ्रॉकमध्ये सुरेल्या आवाजात वंदे मातरम गायले आणि ही क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. तिने गायलेलं गाणं सोशल मीडिया चांगलंच व्हायरल झालं होतं. तिचा व्हिडीओ मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा त्यांच्या ट्विटअर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही तिच्या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. बाबो! कारप्रेमी पठ्ठ्यानं घरावर बांधली स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी, महिंद्रा म्हणाले......
या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, "एस्थर नास्ते आम्हाला तुझ्यावर गर्व आहे. अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केलं आहेस". एस्थरच्या व्हिडीओला ३३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. एस्थरच्या यू ट्यूब चॅनलवर ७३ हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आहेत. एस्थर नान्ते ही मिझोरमच्या लुंगलेईची रहिवासी आहे. ए. आर रहमान यांचं 'मा तुझे सलाम..वंदे मातरम्' हे गाणं तिने गायलं आहे. ए.आर रहमान यांनीही तिचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तेरी मेहरबानिया! २ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पाहिला अन् मालकानं जीव दिला