गुजरातच्या अनेक भागाामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाल्यानं नद्या भरून वाहू लागल्या आहेत. १०० पेक्षा जास्त ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोढेराचं सुर्यमंदीर आहे. एक अद्भूत दृश्य तुम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून पाहू शकता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल खूप पाऊस पडत आहे. शिड्यावरून पाणी वाहत आहे. मंदिराचा आधीचा आणि नंतरचा व्हिडीओ शेअर करून मोदींनी पावसात हे सुर्यमंदीर सुंदर आकर्षक दिसत असल्याचं म्हटलं आहे. यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की, मोढेराचे प्रतिष्ठित सूर्य मंदिर पावसात सुंदर, नयनरम्य दिसत आहे.
गुजरातमध्ये आतापर्यंत सरासरी 106.78 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक धरणं संपूर्णपणे भरून वाहू लागले आहेत. हे भव्य सुर्यमंदिर गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा गावातील पुष्पावती नदीच्या किनारी आहे. हे ठिकाण पाटनपासून 30 किलोमीटर दक्षिणेला आहे. हे सुर्यमंदीर स्थापत्य आणि शिल्पकलेचं उदाहरण आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
हे पण वाचा-
'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...
सलाम! कधीही विसरणार नाही रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोनायोद्ध्याचं बलिदान; मन हेलावून टाकणारा फोटो