पिकाचे महत्त्व फक्त शेतकरीच समजू शकतो, कारण त्याला त्यामागची मेहनत माहीत असते. शेतकरी आणि पिकांशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून कधी कधी मन आनंदी होते, तर कधी फोटो भावूक करतात. इंटरनेटवर असाच एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक पोलीस शेतकऱ्याला मदत करताना दिसत आहे.
मन जिंकणाऱ्या या फोटोवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. शेतात वणवा लागल्यानंतर पोलीस कर्मचार्याने शेतकर्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. जेणेकरून पीक सुरक्षित ठिकाणी नेऊन जळण्यापासून वाचवता येईल. ज्या युजर्सनी हा फोटो पाहिला आहे ते पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक करताना थकत नाहीत. हा शेतकऱ्याचा मुलगा असावा, ज्याला पिकाचे महत्त्व आणि शेतकऱ्याची मेहनत कळत आहे असंही म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेच्या अधिकृत ट्विटर पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, बलिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाला आग लागली तेव्हाचा फोटो. आपले कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा आपला संकल्प आहे. या फोटोला आतापर्यंत 156.9K व्ह्यूज मिळाले आहेत, तर 4 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"