Police dance : मास्कचे महत्व पटवून देत पोलिसांनी धरला ठेका; पाहा खाकी वर्दीच्या डान्सचा जबरदस्त व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:04 PM2021-04-29T19:04:33+5:302021-04-29T19:12:11+5:30
Police dance : १ मिनिट २९ सेंकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस खाकी वर्दीत एन्जॉय एनजामी या गाण्यावर डान्स करून लोकांना कोरोना व्हायरसबाबत जागरुक करत आहेत.
सोशल मीडियावर केरळपोलिसांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस रात्रीच्यावेळी रस्त्यावर डान्स करत आहे. केरळ पोलिसांनी कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जागृती परसवण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस खाकी वर्दी घालून 'एन्जॉय एनजामी' या तामिळ गाण्यावर डान्स करत आहेत.
या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत पोलिसांनी लोकाना मास्कचा वापरण्याचे तसेच लस घेण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पोलिसांना सगळ्यांनी मिळून लस घेऊया, हा संदेश दिला आहे. केरळ पोलिस नेहमीच तुमच्या सोबत आहेत. असंदेखील म्हटलं आहे.
सलाम! समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो; फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक
१ मिनिट २९ सेंकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस खाकी वर्दीत एन्जॉय एनजामी या गाण्यावर डान्स करून लोकांना कोरोना व्हायरसबाबत जागरुक करत आहेत. डान्सच्या माध्यामातून लोकांना मास्क व्यवस्थित घाला, हॅण्ड सॅनिटायजरचा वापर करा असं आवाहन करत आहेत.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
व्हिडीओच्या शेवटी पोलिसांनी लोकांना लस घेण्याबाबत आवाहन केलं आहे. २७ एप्रिलला फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३५ हजारांपेक्षा जास्त रिएक्शन्स मिळाल्या आहेत. लोक पोलिसांच्या या कामावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.