इंजेक्शनची भीती लहान मुलांसह कित्येक मोठ्या माणसांनाही वाटतेच. पण तरी लहान मुलांसारखं कुणी रडत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटले चक्क एक पोलीस इंजेक्शनच्या भीतीने लहान मुलांसारखा रडू लागला. तो इतका घाबरला की त्याने लहान मुलांसारखं भोकाड पसरलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पोलीस ज्यांना कशाचीच भीती नसते. छाती ताणत गुन्हेगाराच्या छातीवर गोळ्या झाडतात. पण या व्हिडीओतील पोलिसाने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. कुणावर गोळ्या झाडणं दूरचीच गोष्ट या पोलिसाची साधं ब्लड टेस्टसाठी आपलं ब्लड सॅम्पल देण्याच्या विचारानेच हवा टाइट झाली. ब्लड सॅम्पल घेण्याच्या आधीच तो थरथर कापू लागला. जेव्हा त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं जात होतं, तेव्हा त्याने तांडव केला. जसं इंजेक्शन शरीरात घुसवलं तसं तो मोठमोठ्याने किंचाळू लागला, ओरडू लागला. लहान मुलासारखं त्याने भोकाड पसरलं.
व्हिडीओत पाहू शकता पोलिसांसाठी कदाचित एक कॅम्प लावण्यात आलं आहे. ज्यात पोलिसांची ब्लड टेस्ट केली जाते आहे. एक पोलीस ब्लड सॅम्पल देण्याआधीच थरथर कापताना दिसतो आहे. दुसरा पोलीस त्याला धरून समोर खुर्चीवर बसवतो. पोलिसाला घाम फुटल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. डॉक्टरसमोर तो हातही जोडतो. त्यानंतर काय काय बडबडू लागतो. विचित्र विचित्र आवाज काढू लागतो. त्याला पकडण्यासाठीच तीन-चार लोक होते. ब्लड सॅम्पल देण्यासाठी पोलिसाने इतके नखरे केले की कोणतं लहान मूलही करत नाही.
giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा पोलीस उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ब्लड सॅम्पल दिल्यानंतरही तो रडत राहतो. त्याला पाहून इतर पोलीसही हसू लागतात. व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. एका युझरने कोणतं नशा करून आला आहेस विचारलं आहे, तर एकाने तू गोळी काय खाणार, असं विचारलं आहे.