कोरोनाकाळात माणूसकीचा खरा अर्थ सगळ्यांनाच कळला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोनायोद्धे दिवसरात्र झटत आहेत. कोणासाठी देवदूत तर कोणासाठी अन्नदाता बनून आरोग्यसेवेतील कर्मचारी, पोलिस कर्मचारी मदतीचा हात पुढे देत आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या घटकांनी गोरगरीबाांना मदत पुरवली. अनेक लहान मुलांनी आपली बचत कोरोना साहाय्यता निधीसाठी दिली. अशीच एक सकारात्मक घटना समोर येत आहे.
एका भिक्षा मागून पोट भरत असलेल्या वृद्धाने राज्य सरकारकडे कोरोना रुग्णांसाठी तब्बल ९० हजारांची रक्कम जमा केली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या पुलपंडीयन भागात हे गृहस्थ वास्तव्यास आहेत. त्यांनी वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य सरकारकडे ९० हजार रुपये मदत म्हणून दिले आहेत. या कामानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबांना 'समाजसेवक' असं म्हटलं आहे.
भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असलेल्या आजोबांनी मे महिन्यात १० हजार सरकारकडे कोरोना रुग्णांसाठी दान केले होते. मंदिराच्याबाहेर बसून हे आजोबा भिक्षा मागण्याचं काम करतात. मे महिन्यात १० हजार दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण क्षेत्रासाठी मला हे पैसे दान करायचे होते. परंतु सध्या कोरोनाचा मुद्दा महत्वाचा असल्यामुळे उपचारांसाठी दान करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोशल मीडियावर हा या बाबांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी खरा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. कोरोना रुग्णांसाठी या वृद्ध व्यक्तीने केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे.
हे पण वाचा-
दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी!
कौतुकास्पद! हजारो प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या 'रसिला वाढेर'!!
सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल