स्त्री सहनशीलता आणि कर्तृत्व यांच्या जोरावर जगातील कोणतंही अशक्य असं काम ती करू शकते. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा व्हिडींओच्या माध्यमातून कोणी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला पाहायला मिळतो. असामान्य कार्याचे, कामगिरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच जास्त पाहिले जातात. सध्या एका गर्भवती महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच राहिले आहेत. मायकेल मायेर या युजरने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Michael Mayer यांनी आपली पत्नी Makenna सोबत पळण्याची शर्यत लावली होती. त्यांच्यामते नवव्या महिन्यात ८ मिनिटात एक मैल अंतर महिला पार करू शकते. पण मेकान्नानं ५ मिनिट २५ सेकंदात ही शर्यंत पूर्ण केली आहे. या महिलेच्या जिद्दीमुळे तिने तिच्या पतीलाही हरवलं आहे. पत्नीने हरवल्यामुळे मायकेल खूप खूष आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, मी गर्भवती नसतानाही इतकं धावू शकत नाही. धावण्याची शर्यंत जिंकलेल्या महिलेला आयरन लेडी असं म्हटलं आहे. या आधीही गर्भवती महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर परिक्षा दिल्याची घटना समोर आली होती.
अमेरिकेतील इलियॉन येथिल रहिवासी असलेली ब्रायना हिल ही महिला परीक्षेसाठी परिक्षा केंद्रावर पोहोचली. परिक्षा सुरू होण्याच्या आधीच एक अनपेक्षित प्रकार घडला. ब्रायना ही शिकागो लॉ स्कूलमधून वकीलीची परीक्षा देत होती. परिक्षा हॉलमध्ये शिरताच तिला प्रसृतीकळा सुरू झाल्या. सीएनएननं दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रायनाला पेपर सुरू होण्याच्या ३० मिनिटंआधीच या वेदना सुरू झाल्या होत्या. वेदना होत असतानाच ब्रायना पेपर सोडवायला बसली. काहीवेळानंतर वेदना असहय्य झाल्याने तिने नवऱ्याला बोलावून घेतले. काय सांगता?... 'या' गावात फक्त दोघचं राहतात, तरीही घेतलीय कोरोनाची धास्ती!
संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ब्रायनाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री १० वाजता ब्रायनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी तिचा दुसरा पेपर होता, अखेर विद्यापीठाची परवानगी घेतली त्यानंतर ब्रायनाने रुग्णालयात दुसरा पेपर दिला. यानंतर प्रशासनाचे आणि विद्यापीठाचे मनापासून आभार मानले. बाबो! आकाशात एलियन उडताना पाहून सगळ्यांचीच उडाली झोप; अन् मग झालं असं काही....