प्रेम प्रकरणात कधी काय होईल सांगता येत नाही. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची किरकोळ कारणावरुन भांडण आपण पाहिली आहेत. पण, सध्या एक वेगळच प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने तरुणीला प्रपोज केलं, तरुणीने नकार दिला, या रागातून त्याने तरुणीच्या बॉयफ्रेंड्या घरी कुरिअरने बॉम्ब पाठवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बॉयफ्रेंडच्या घरी एक कुरिअर आलं. ते काढून पाहिलं तर या बॅगेत बॉम्ब सापडला, तो बाहेर काढेपर्यंत त्याचा मोठा स्फोट झाला. या तो गंभीर जखमी झाला. ही घटना अमेरिकेतील आहे. येथील एक तरुण पहिल्याच नजरेत एका तरुणीच्या प्रेमात पडला, त्या तरुणाने तिला प्रपोजही केलं. यावेळी त्या तरुणीने बॉयफ्रेंड असल्याचे सांगून नकार दिला.
Video - वय हा फक्त आकडाच! 98 व्या वर्षी महिलेने पूर्ण केली 5 किमीची रेस; आला पहिला नंबर
पुढे या तरुणाला तरुणीचा चांगलाच राग आला. त्याने रागाच्याभरात तरुणीच्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मुलीच्या प्रियकराला बॉम्बने उडवण्याचा कट रचला. त्याने बॉम्ब तयार करण्यास सुरुवात केली.
यात त्याने छोटा बॉम्ब तयार केला. त्या मुलाने ते भेटवस्तूसारखे पॅक केले. त्याने बॉफ्रेंडच्या पत्त्यावर पाठवले. हे पॅकेट उघडताच त्याचा स्फोट झाला, या तो प्रियकर गंभीर जखमी झाला. त्याला यावेळी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले.
पोलिसांनी तरुणीच्या जबाबाच्या आधारे तपास केला, त्यानंतर आरोपीची ओळख पटली. आरोपीने घरी बॉम्ब तयार केल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणावरुन बॉम्ब बनवण्यासंबंधीचे साहित्य खरेदी केले.