Happy Propose Day: सात फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली. आज प्रपोज डे साजरा केला जात आहे. लोक या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस सर्वात खास मानला जातो. जर तुम्हालाही तुमच्या मनातील प्रेम कुणाला सांगायचं असेल तर बिनधास्त सांगून टाका. सोशल मीडियावर लोक आपापल्या अंदाजत प्रपोज डे साजरा करत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर #ProposeDay ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक प्रपोज डे संबंधी मजेदार मीम्स, शायरी आणि जोक्स शेअर करत आहेत. जे यूजर्सना चांगलेच आवडत आहेत. इतकंच नाही तर लोकांचा हा मजेदार अंदाज पाहून सगळ्यांचा मूड चांगला होत आहे.
अशाप्रकारचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. तुम्हीही या मजेदार मीम्सचा आनंद घेऊ शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून त्यांनाही आनंंद देऊ शकता.