PSL Viral Video: पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात २७ जानेवारीपासून झाली. कराची किंग्ज आणि मुलतान सुलतान यांच्यात सलामीची लढत झाली. स्पर्धा सुरू होण्याआधी स्टेडियमला आग लागली होती. पण आता स्पर्धा चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि विविध संघांचे चाहते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. याच स्पर्धेत कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यातील सामन्यात एक विचित्र घटना घडली. त्यामुळे स्टेडियममध्ये बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड आधी गोंधळून गेली आणि नंतर प्रकरण समजताच हसू लागली.
कराची किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पेशावर झल्मीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना १७४ धावांचं लक्ष्य दिले. झल्मीच्या डावादरम्यान एक विचित्र घटना घडली. बेन कटिंग खेळत असताना बेल्स स्टंपवरून पडली, पण बेन कटिंग मात्र बचावला. कटिंग बाद झाला असं समजून पत्नी एरिन हॉलंडला दु:ख झाले. पेशावर झल्मीच्या डावाच्या १४व्या षटकात बेन कटिंग स्ट्राइकवर आणि मोहम्मद नबी गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. नबीने वेगाने चेंडू टाकला आणि कटिंगने चेंडू फ्लिक केला. जेव्हा फलंदाजाने चेंडू खेळला तेव्हा बेल्स खाली पडली. त्यामुळे कटिंगची पत्नी एरिन हॉलंड नाराज झाली. तिची प्रतिक्रियाही कॅमेऱ्यात कैद झाली. पण त्यानंतर हे स्पष्ट झालं की विकेटकीपरच्या हातमोजेमुळे बेल्स पडली होती. हे कळल्यानंतर एरिनने छान स्मितहास्य केलं अन् आपला आनंद व्यक्त केला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, सामन्यात कराची किंग्जला २० षटकांत लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत खेळलेले सर्व ४ सामने गमावले. आता ते स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे विजयी संघ पेशावर झल्मी गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.