डॉग लव्हर्स म्हणजेच कुत्र्यांवर प्रेम असणाऱ्यांमध्ये पग प्रजातीच्या कुत्र्यांची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. तोच कुत्रा ज्याला तुम्ही व्होडाफोनच्या जाहिरातीत पाहिलं होतं. कुत्र्यांची ही प्रजाती आपल्या क्यूटनेससाठी आणि इमानदारीसाठी लोकप्रिय आहे. आता म्हणाल की, या कुत्र्याची आता का इतकी चर्चा का? इतका क्यूट दिसणारा कुत्रा आतून कसा दिसतो यावर लोकांना विश्वासच बसत नाहीये.
हे तेवढंच खरं आहे की, निसर्गाने सगळ्यांच्या संरचनेत कोणतीच कमतरता ठेवली नाहीये. सांगाड्यावर मांस आणि त्वचेच्या माध्यमातून निसर्गाने मनुष्याला सुंदर केलंय. हेच प्राण्यांसोबतही केलं आहे. पण लोक हैराण यासाठी झाले आहेत की, त्यांचा आवडता पग कुत्रा आतून असा दिसत असेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
अभिनेता-कॉमेडिअन एंडी रिचरने एका मित्राच्या पगचा MRI स्कॅन शेअर केला आहे. हा फोटो पाहूनच लोक हैराण झाले आहेत. ट्विटरवर एंडीने हा १८ डिसेंबर २०१९ ला शेअर केला होता. पण आता हा फोटो व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा फोटो १६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केलाय तर १३२.५ के लाइक्स याला मिळाले आहेत.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, कुत्र्यांच्या पग ब्रीडची सुरूवात चीनमध्ये झाली होती. यूरोपमध्ये त्यांना जवळपास ३०० वर्षांआधी नेण्यात आलं. राणी व्हिक्टोरियाला पग कुत्र्यांची खास आवड होती. या कुत्र्यांचं सरासरी आयुष्य १२ ते १५ वर्ष असतं.