न्यू मोटार व्हेइकल अॅक्टनंतर धडाधड चालान कापले जात आहेत. यावरून अनेक ठिकाणी किती वाद झाले. त्यानंतर राज्य सरकारांनी चालानची रक्कम जरा कमी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ट्विटरवरील एका फोटोवर फारच मजेदार कमेंट केली होती. आता पुन्हा पुणे पोलिसांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हे ट्विट प्रत्येक बाइक चालकाच्या चांगलंच लक्षात राहील.
या ट्विटमध्ये पुणे पोलिसांनी लिहिले आहे की, 'Khaansaab ला कूलही बनायचं आहे, Khaansaab ला हेअरस्टाईल दाखवायची आहे, Khaansaab लो हिरोची बाइक चालवायची आहे, पण Khaansaab ला ट्रॅफिक रूल्स काही फॉलो करायचे नाहीत. असं कसं चालेल Khaansaab?'.
Iamchandra नावाच्या एका यूजरने ट्विट केलं. यात त्याने एका व्यक्तीचा फोटो शेअर केला. तो विना हेल्मेट रेड लाइटवर उभा आहे. या ट्विटमध्ये त्याने पुणे पोलिसांना टॅग केलं.
नंतर पुणे ट्रॅफिक पोलिसांकडून यावर रिप्लाय देण्यात आला की, या व्यक्तीचं चालान कापलं गेलं आहे. याच व्यक्तीच्या गाडीच्या नंबर प्लेटवर 'खानसाब' लिहिलं आहे. आता जर तुम्हाला वाटतं असेल की, तुम्हीही काहीही करून नियम तोडाल आणि हे कुणाच्याच लक्षात येणार नाही तर तुमचा हा गैरसमज दूर करा. नाही तर एखाद्या दिवशी तुमचा फोटो ट्विटरवर असा व्हायरल होईल.