Puzzle Challenge : सोशल मीडियावर नेहमीच गेम्स आणि वेगवेगळे पझल्स असलेले फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटोही व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. यातून चांगला टाइमपासही होतो आणि नॉलेजही वाढतं. काही फोटो असे असतात ज्यात कोडं उलगडण्याचं चॅलेंज दिलं जातं. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल असे फोटो तुमच्या मेंदुसाठी आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी फार फायदेशीर असतात. कारण यातून तुम्हाला किती नॉलेज आहे आणि तुमचा आयक्यू किती आहे हेही जाणून घेता येतं. या फोटोंच्या माध्यमातून तुमचा शब्दांचा साठाही वाढतो. तसेच मेंदू व डोळ्यांची चांगली कसरतही होते. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो आणि मजबूत होतो.
ट्रक किंवा मालवाहू वाहनांमागे अनेक फार मजेदार गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्या मागच्या गाडी बसलेल्या व्यक्तींचं चांगलं मनोरंजन करतात. कधी कधी या गोष्टी इतक्या फनी असतात की, पोटधरून हसायला येतं. तर कधी कधी मेंदुला खाद्य असणाऱ्या गोष्टी असतात.
तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक ट्रॅक्टरची ट्रॉली दिसत आहे. ज्यात वाळू भरलेली आहे आणि मागच्या बाजूला काही चित्र आहेत. सोबतच थोडं खाली काही अक्षरं आणि काही आकडे लिहिलेले आहेत. ज्यात इंग्रजी अक्षर, हिंदी अक्षर आणि काही अंक आहेत. त्यातून तुम्हाला जे काही लिहिलं आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे. आहे की नाही गंमत. यासाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.
जर तुम्हाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमागे लिहिलेल्या गोष्टीचा अर्थ १५ सेकंदात उलगडता आला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही अर्थ समजला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ते काय आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. याचं उत्तर आहे "पढाई जीवन का आधार हैं".