शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

Viral Video: भलमोठा अजगर त्या हरणाला गिळतच होता, तेवढ्यात तिथे आला एक युवक अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 5:51 PM

एक अजगर एका हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे (Python Trying to Swallow Deer). याचसाठी त्याने हरणाला पकडून ठेवलेलं होतं. यादरम्यान असं काही होतं, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

अजगर हा अतिशय क्रूर प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांनाही जिवंत गिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अजगर एका हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे (Python Trying to Swallow Deer). याचसाठी त्याने हरणाला पकडून ठेवलेलं होतं. यादरम्यान असं काही होतं, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

व्हिडिओमध्ये (Shocking Video of Python) तुम्ही पाहू शकता की, हरणाच्या एका मोठ्या अजगराने हरणाच्या भोवती विळखा घातला आहे. अजगराला या हरणाला जिवंत गिळायचं होतं. यादरम्यान एका तरुणाची नजर अजगर आणि हरणावर पडली. यानंतर हा तरुण हरणाचा जीव वाचवण्याचा विचार करतो. त्यासाठी तरुण झाडाची एक फांदी घेऊन येतो. झाडाच्या या फांदीने तरुण अजगराला मारायला सुरुवात करतो. यानंतर अजगर चिडतो आणि तरुणाकडे धावतो (Python Attack Video).

व्हिडीओमध्ये दिसतं की, अजगर तरुणाच्या दिशेने येत असताना अतिशय रागात दिसत आहे. मात्र हा तरुण आधीच सावध होता. जेव्हा अजगर त्याच्याकडे येऊ लागतो तेव्हा तो बरंच दूर उभा राहतो. यानंतरही तरुणाने अजगराला मारणं सुरूच ठेवलं, त्यानंतर अखेर अजगराला हरणाला सोडून तिथून पळ काढावा लागला. जेव्हा अजगर हरणाला त्याच्या पकडीतून सोडतो तेव्हा तुम्हाला हरणाच्या वेदना जाणवतील. अजगर रागात हरणाला सोडण्यापूर्वी आपल्या सर्व शक्तीनिशी हरणाचं शरीर आवळतो.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेजारून जाणाऱ्या लोकांनी रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ थायलंडचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, हरणाचा जीव वाचवण्यासाठी युवकाने दाखवलेली हिंमत पाहून तुम्ही थक्क व्हाल. भुकेलेला अजगर हरणाला सहजासहजी सोडायला तयार नव्हता, असं व्हिडिओमध्ये दिसतं. हा व्हिडिओ थायलंडमधील ड्यूसिट प्राणीसंग्रहालयाच्या सहाय्यक संचालकाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया