सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हि़डीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हि़डीओ पाहून आश्चर्याचा धक्का देखील बसतो. लोक असे अजब प्रकार का करत असतील असा प्रश्न देखील अनेकदा पडतो. त्याबाबत जोरदार चर्चा देखील रंगते. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या कपाळावर थेट QR कोडचा टॅटू काढून घेतला आहे.
कपाळावर असा विचित्र टॅटू काढणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने आपल्या कपाळावर QR कोड टॅटू काढला जेणेकरून जो कोणी तो स्कॅन करेल तो थेट त्याच्या Instagram अकाऊंटवर जाईल. यावर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये टॅटू बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये काही वेळा त्या व्यक्तीला थोडा त्रास होत असल्याचं दिसत आहे, पण टॅटू आर्टिस्ट काम करत आहे. त्यानंतर संपूर्ण टॅटू काढून होईपर्यंत माणूस शांत राहतो. हा व्हिडीओ 2 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला असून 10 हजारांहून अधिक लाईक्स आणि विविध कमेंट्स आल्या आहेत.
या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं की, "ही चांगली कल्पना आहे. दुसऱ्याने कमेंटमध्ये "हे खोटं असल्याचं दिसतं आहे" असं म्हटलं. तर काहींनी याचा काहीच उपयोग होणार नसून या व्यक्तीचं अकाऊंट इन्स्टाग्रामनेच बंद केलं पाहिजे असं म्हटलं आहे. सध्या हा व्हि़डीओ खूप व्हायरल होत असून त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.