रायबरेली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोडले जात आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेलीत असाच एक प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महराजगंज रोडवरील एका दुकानातून गुपचूप दारू विकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बीयर विक्री करणाऱ्या दुकानाचा मुख्य दरवाजा बंद ठेवून भिंतीमधून दारूच्या बाटल्या विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांकडून अधिक रक्कम घेतली जात आहे. ग्राहकांना दारू पुरवण्यासाठी भिंतीत होल तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून संध्याकाळी ७ नंतरही सर्रासपणे दारूची विक्री केली जाते. विदेशी मद्यासाठी २० ते १०० रुपये अधिक आकारले जात आहेत. तर बीयरच्या एका कॅन आणि बाटलीमागे २० ते ५० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत.
काय सांगता? चक्क भिंतीतून येतेय दारू; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:51 PM