Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असता. असाच एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोन पिढ्या एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या फोटोला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असून, अनेकजण फोटोवर कमेंट आणि शेअरदेखील करत आहेत.
वडील गार्ड तर मुलगा टीटीईसध्या व्हायरल होत असलेला फोटो एका बाप-लेकाचा आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? तर या फोटोतील विशेषता म्हणजे, मुलगा रेल्वेमध्ये तिकीट चेकर(TTE) आणि वडील रेल्वेतच गार्ड आहेत. ते दोघे वेगवेगळ्या ट्रेनमध्ये ड्युटी करत होते, यादरम्यान दोघांच्या ट्रेन एका क्रॉसिंग पॉइंटवर एकत्र आल्या. यावेळी मुलाने वडिलांसोबत सेल्फी घेतला. या बाप-लेकाचा सेल्फी सध्या व्हायरल होत आहे.