रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावास राखी बांधून देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत आहे.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात.
नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,मी सदैव जपलंयहरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणीआज सारं सारं आठवलंयहातातल्या राखीसोबतचताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखीबांधिते भाऊराया आज तुझ्या हातीऔक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योतीरक्षावे मज सदैव, अन् अशीच फुलावी प्रीतीबंधन असूनही, बंधन हे थोडेचया तर हळव्या रेशीमगाठी
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असतेनेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरअसेल हातात हातअगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरहीअसेल माझी तुला साथ
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनघेऊन आला हा श्रावणलाख लाख शुभेच्छा तुलाआज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
काही नाती खूप अनमोल असतातहातातील राखी मला याची कायमआठवण करून देत राहीलतुझ्यावर कोणतेही संकट येऊ नयेआणि आलच तर त्याला आधीमला सामोरे जावे लागेल
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा..