बाईक-टॅक्सी एग्रीगेटरच्या कॅब चालकांकडून महिलांसोबत असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका रॅपिडो चालकाने मध्यरात्री एका मुलीला मेसेज केला. हुस्नपरी नावाच्या एका ट्विटर युजरने या चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
स्क्रीनशॉटनुसार, रॅपिडो ड्रायव्हरने मुलीला सांगितले की तो तिचा आवाज ऐकून आणि तिचा डीपी पाहूनच आला आहे. अन्यथा तो पिकअपसाठी आला नसता. ट्विटरवरील तिच्या पोस्टमध्ये महिलेने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर कॅब कंपनीने चौकशी करून चालकावर कारवाई करण्यास सांगितले आहे.
रॅपिडो केअर्सने देखील यावर उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये हे खूप निराशाजनक आहे. आम्ही माफी मागतो. या प्रकरणाची निश्चितपणे प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. कृपया तुमचा मोबाईल नंबर आणि आयडी शेअर करा. निश्चितपणे कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.
ट्विटवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ही घटना कॅब कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल अनेकांनी कौतुकही केले आहे. एका युजरने लिहिले की आजकाल रॅपिडो सुरक्षित नाही. तर दुसऱ्याने लोकेशन सांगणं ही समस्या ठरू शकते असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"