Mountain Animal : आपल्याला सामान्यपणे त्याच प्राण्यांबाबत माहीत असतं जे आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहतात. किंवा ते ज्यांच्याबाबत आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं. पण असे अनेक प्राणी आहे जे आता लुप्त झाले किंवा फार कमी नजरेस पडतात. अशात हे प्राणी दिसले तर थक्क व्हायला होतं. अशाच एका लुप्त झालेल्या प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून विचारण्यात आलं आहे की, हा कोणता प्राणी आहे?
IFS अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लडाखमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओत सर्वसाधारणपणे वाघ किंवा मांजर जातीमधील हा प्राणी दिसून येतो. मात्र, यापूर्वी आपण तो सहजपणे चित्रातही पाहिलेला नसेल, असाच प्राणी दिसत आहे. या प्राण्याभोवती जंगली कुत्रे भुंकतानाही व्हिडिओत दिसते. लडाखमध्ये आढळून आलेला हा दुर्मिळ प्राणी कोण? असा प्रश्न परवीन कासवान यांनी विचारलाय. त्यावर, अनेकांनी उत्तर दिलं आहे.
कमेंट बॉक्समध्ये काही लोकांनी सांगितलं की, हा प्राणी हिमालयात अनेकदा बघण्यात आला. कारण तो बर्फाळ डोंगरांमध्ये जास्त राहतो. व्हिडिओत तुम्ही त्याला शांत बसलेला बघू शकता. तर बाकीचे मोकाट कुत्रे त्यावर भुंकत आहेत. एका यूजरने लिहिलं की, हा एक हिमालयन लायनेक्स आहे (Himalayan lynx) आहे. जो आशियातील डोंगरांमध्ये आढळतो.